दोन शब्द....
सर्व तंत्रस्नेही मित्रांचे स्वप्नपूर्ती कॉम्प्युटर्स च्या साईट वर हार्दिक स्वागत...सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...कॉम्प्युटर तंत्रज्ञानात आपण पारंगत व्हावं हा स्वप्नपुर्ती कॉम्पुटर्स चा मुख्य उद्धेश आहे, कॉम्पुटरशी संबंधित तंत्र आपण आत्मसात करावीत हा स्वप्नपुर्ती कॉम्प्युटरचा हेतू आहे. आजच्या काळात या कौशल्यांची खरोखर गरज आहे. निरनिराळी अप्लिकेशन पॅकेजेस आणि इंटरनेटचा परिणामकारक व प्रभावी वापर कसा करावा याचं तंत्र आपण शिकणार आहोत. पंधरा वर्षांपूर्वी,आपल्यापैकी अनेकांना कॉम्प्युटरची फार माहिती नव्हती. अर्थात आपण कॉम्पुटरद्वारे निरनिराळे फॉर्म भरले असतील,कॉम्प्युटरवर परीक्षा दिल्या असतील आणि बिलही भरली असतील. मात्र खऱ्या अर्थाने कॉम्प्युटरवर काम केले ते तंत्रज्ञांनी -प्रोग्रॅमर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटरार्स आणि कॉम्प्युटर ऑपरेटर्सनी. त्यानंतर आले मॅक्रोकॉम्पूटर्स.यामुळे सारं चित्रच बदललं. आज जवळजवळ प्रत्येक जण कॉम्पुटरचा सहज वापर करू शकतो.
संगणक आणि मुले - आजचे चित्रबहुतेक मुलांना उपजतच संगणकाचे अतिशय आकर्षण असते. संधी मिळताच ते पीसी, मोबाईल फोन, अथवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट दिसले की त्यावर तुटून पडतात. या मुलांचे संगणकाबरोबर खेळण्याचे स्वरूप बहुतांशी इंटरनेट ब्राउझ करणे, आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर ईमेल अथवा चॅट च्या माध्यमातून गप्पा मारणे, गेम्स खेळणे, किंवा वर्ड प्रोसेसर सारखे तयार सॉफ्ट्वेअर वापरणे, एवढ्यापुरते मर्यादित असते. शाळांत देखील मुलांची संगणकाबरोबर ओळख करून देण्याचे जे चांगले उपक्रम चालू आहेत ते देखील संगणक साक्षरता याच्या पलीकडे जाताना दिसत नाहीत.
नवीन कल्पना: प्रोग्रॅमिंग हे एक शिकण्याचे माध्यमप्रोग्रॅमिंग म्हणजे संगणकाशी थेट संवाद साधून त्याच्या अचाट शक्तीला हात घालणे. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून मुले संगणकाच्या अदम्य शक्तीच्या साहाय्याने भौमितिक आकृती व सुंदर चित्रे काढू शकतात, ऍनिमेशन बनवू शकतात, गणितातील किंवा शाब्दिक कोडी सोडवू शकतात, किंवा रोबोज देखील बांधू शकतात. संगणकाबरोबर अशा प्रकारची मैत्री जोडता आली तर मुलांची बौद्धिक क्षमता व सृजनशीलता यांना तर चालना तर मिळतेच, त्याशिवाय त्यांचा गणित व भौतिकशास्त्र अशा विषयांतला रसही वाढतो.
प्रोग्रॅमिंग शिकताना भाषेची निवड अतिशय महत्त्वाची आहे. लोगो, ऍलीस यांसारख्या, खास मुलांसाठी बनवलेल्या प्रोग्रॅमिंग सिस्टिम्स चाच वापर करणे जरूरीचे आहे. या सिस्टिम्स शिकायला सोप्या आणि मनोरंजक तर आहेतच, तसेच प्रोग्रॅमिंग साठी अतिशय समर्थ देखील आहेत. या भाषा वापरताना विद्यार्थी भाषेचे व्याकरण आणि इतर गुंतागुंतीत न अडकता स्वतःच्या बेताने आणि वेगाने भाषेचा शब्दसंग्रह व प्रभुत्व वाढवत नेऊ शकतात.
स्वप्नपूर्ती कॉम्प्युटर्स,कुरुंदा
दुर्गादास गुव्हाडे
मो. 9503001994,02454206028
